अवघ्या काही तासांत गेवराई पोलिसांनी गून्ह्याचा छडा लावला
गेवराई दि 28 ( वार्ताहार ) शहरातील रंगार चौक याठिकाणी रहिवासी असलेल्या एका( 36 वर्षिय ) तरूणाचा खून झाला असल्याची घटना ( दि 28 रोजी ) सकाळी उघडकीस आल्यानंतर गेवराई शहरात खळबळ उलाडी होती. परंतू यांचा खून झाला असल्याचे बाब तपासात समोर आली आहे तसेच मयताच्या भावाने ईतर लोकांच्या मदतीने आपल्या सख्या भावाची हत्या केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , मनोहर विलास पुंड ( वय 36 वर्ष ) राहणार रंगारचौक गेवराई असे या खून झालेल्या तरूणाचे नाव आहे आज सकाळी शहरालगतच्या बागवान कब्रस्थान परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये या तरूणांचा सशंयास्पद अवस्थेत मृत्यूदेह मिळून आला होता तसेच उत्तरीय तपासणी नंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मयत तरूणांच्या भाऊ दर्शन विलास पुंड ( वय 31)याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने सांगितले की ,माझा भाऊ याने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते तसेच तो दारू पिऊन घरी येऊन नेहमी त्रास देत असे यालाच वैतागून मी सदरची माहिती माऊली आनंद बाप्ते ( वय 30 ) वर्ष राहणार रंगारचौक याला सांगितले तसेच त्याने माझा भाऊ याला ईतर तिन साथीदार यांच्या मदतीने बागवान कब्रस्थान परिसरातील एका शेडमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्याला अमानुष मारहान करूण जिवे मारल्याची कबूली तरूणांच्या भावाला दिली आहे तसेच गेवराई पोलिस ठाण्याचे पो हे उगलमुगले यांच्या फिर्यादीवरूण दर्शन विलास पुंड , माऊली आनंद बाप्तेसह ईतर तिन जनाविरूद्ध खूनाचा गून्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तूकाराम बोडके हे करत आहेत .