गेवराई दि 27 ( वार्ताहार ) शहरातील रंगार चौक परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षिय तरूणाचा मृत्यूदेह बागवान कब्रस्थान परिसरात सापडला असल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान घटनास्थळी गेवराई पोलिस हजर झाले असुन मनोहर विलास पुंड ( वय ३६ वर्ष ) राहणार रंगार चौक गेवराई असे या खून झालेल्या तरूणाचे नाव असल्याची माहिती असुन उत्तरीय तपासणीसाठी मयताला गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले असुन पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत तसेच सदरची घटना आज ( दि 28 रोजी ) सकाळी उघडकीस आली असुन गेवराई शहरात खळबळ माजली आहे.