शारदा प्रतिष्ठानच्या टिपरे महोत्सवात धर्मवीर संघ प्रथम तर झुंजार संघ द्वितीय
टिपरे व सोंग लोककलेची राज्य सांस्कृतिक मंडळ घेणार दखल – विजयसिंह पंडित
गेवराई दि.२३ ( वार्ताहार ) विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली शारदा प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित टिपरे महोत्सवामध्ये गेवराईच्या धर्मवीर संघाने प्रथम, झुंजार संघाने द्वितीय तर ओम संघाने तृतीय पारितोषिक पटकावले. यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, गेवराईच्या टिपरे महोत्सवाची संपुर्ण राज्यात चर्चा होत असून राज्याच्या कला आणि सांस्कृतीक मंडळाने गेवराई च्या टिपरे आणि सोंग लोककलेची दखल घेतली आहे.
पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक जयसिंग पंडित, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, महोत्सव आयोजक विजयसिंह पंडित यांच्या हस्ते विजयी संघाना पारितोषिके प्रदान करण्यात आली. महोत्सवात टिपरे स्पर्धा सांघिक मध्ये धर्मवीर ग्रुपने प्रथम पारितोषिक रोख २१००० रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर झुंजार ग्रुपने द्वितीय रोख १५००० रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि ओम ग्रुपने तृतिय रोख ७०००रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र पारितोषिक पटकावले. जगदंबा आणि शिवनेरी ग्रुपने उत्तेजनार्थ पारितोषिक अनुक्रमे रोख ३००० रुपये,२००० रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळवले. उत्कृष्ट पात्र सजावट मध्ये प्रथम पारितोषिक रोख रु. ५००० आणि स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र झुंजार ग्रुपच्या चिकनमुर्गा या पात्राला देण्यात आले, तर द्वितीय पारितोषिक रोख रु. ३००० व स्मृतीचिन्ह शिवनेरी ग्रुपच्या राम शिंदे यांना मिळाले. तृतीय पारितोषिक रोख रु. २००० व स्मृतीचिन्ह संघर्ष ग्रुपच्या आदिवासी या पात्राला मिळाले. उत्तेजनार्थ प्रत्येकी रोख रु. १००० झुंजार ग्रुपच्या हनुमान आणि धर्मवीर ग्रुपच्या बाल शिवाजी या पात्रांना देण्यात आले. उत्कृष्ट सोंग घेणाऱ्या कलावंतांमध्ये प्रथम पारितोषिक रोख रु. ३००० आणि स्मृतीचिन्ह महेश मोटे यांना, द्वितीय पारितोषिक रोख रु. २००० आणि स्मृतीचिन्ह ओम ग्रुपच्या पेशंट या सोंगाला देण्यात आले. तृतीय पारितोषिक रोख रु. १५०० आणि स्मृतीचिन्ह माऊली ग्रुपच्या महादेव या सोंगाला देण्यात आले. उत्तेजनार्थ रोख रु. १००० चे दोन पारितोषिके संघर्ष ग्रुपच्या जोकर आणि घागरा ओढणी घातलेल्या सोंगाला देण्यात आले. उत्कृष्ट वाद्य वादक म्हणून क्रांती ग्रुपच्या संबळ वादकास प्रथम पारितोषिक रोख रु. २००० आणि स्मृतीचिन्ह तर द्वितीय पारितोषिक रोख रु. १५०० आणि स्मृतीचिन्ह ओम ग्रुपच्या डफडे वादकास देण्यात आले. तृतीय पारितोषिक रोख रु. १००० आणि स्मृतीचिन्ह शिवनेरी ग्रुपच्या झांज वादकास देण्यात आले. उत्तेजनार्थ रोख रु. ७०० चे दोन पारितोषिके माऊली ग्रुपच्या डफडे वादकास तर धर्मवीर ग्रुपच्या झांज वादकास देण्यात आले. स्पर्धा परिक्षक म्हणून डॉ. सुभाष निकम, विलास सोनवणे, प्रा.राजेंद्र बरकसे, प्रशांत रुईकर, विष्णू खेत्रे, प्रकाश भुते यांनी काम पाहिले.
याप्रसंगी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, यापुढील काळातही टिपरे महोत्सव मोठ्या प्रमाणावर घेण्यात येईल. स्पर्धेमध्ये संघांनी सहभाग वाढवावा आणि पूर्ण तयारीशी स्पर्धेमध्ये उतरून गेवराईच्या लोककलेला कलाकारांनी टिपरे महोत्सवाची परंपरा पुढे घेऊन जावी असे आवाहनविजयसिंह पंडित यांनी केले.