गेवराईच्या टिपरे व सोंग लोककलेचा समावेश महाराष्ट्राच्या लोककलेत होईल – विजयसिंह पंडित

शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद

गेवराई दि.२२ ( वार्ताहार ) गेवराई शहराला टिपरे खेळ आणि सोंग या लोककलेचा पारंपरिक वारसा गेवराईला लाभलेला आहे, त्याचे जतन टिपरे महोत्सवाच्या माध्यमातून केले जाईल. या लोककलेची ओळख आता महाराष्ट्रात होत आहे, या टिपरे आणि सोंग कलेचा समावेश महाराष्ट्राच्या लोककलेत निश्चितच होईल असा आशावाद महोत्सवाचे आयोजक विजयसिंह पंडित यांनी केले. शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवाचे उद्घाटनू ते बोलत होते.
माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवाचे उद्घाटन आज मंगळवार दि. २२ ऑगस्ट रोजी मोठ्या थाटात करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक जयसिंग पंडित, पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, जालिंदर पिसाळ, शांतिलाल पिसाळ, युवानेते पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्यासह परिक्षक सर्वश्री सुभाष निकम, विलास सोनवणे, प्रा.राजेंद्र बरकसे, प्रशांत रुईकर, विष्णू खेत्रे, प्रकाश भुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गेवराई येथील पारंपरिक टिपरी आणि सोंग महोत्सव यावर्षी माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी शिस्तबद्ध नियोजन करून यशस्वी केला. विजयसिंह पंडित यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा महोत्सव आयोजित केल्यामुळे गेवराई शहरातील लहान मुले, मुली, महिला, तरुण आणि वयोवृद्ध जनतेने या महोत्सवाचा भरभरून आनंद घेतला. यावर्षी महिलांच्या बैठकीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नागपंचमीच्या निमित्ताने टिपरी आणि सोंग या कलाकृतींची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा गेवराई शहराला लाभलेली आहे. हा सांस्कृतिक वारसा सक्षमपणे चालविण्यासाठी, ही परंपरा जतन करून टिपरे व सोंग या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी आणि तरुण कलावंताना सोबत घेऊन मंगळवार वार, दि.२२ ऑगस्ट रोजी सायं ७ वाजता बाजारतळ, गेवराई येथे टिपरे आणि सोंगस्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले होते. अगदी दुपारपासून शहरातील कलावंत वेगवेगळ्या वेषभूषा करुन बाजारतळाकडे येत होते तर सायंकाळी हा महोत्सव पाहण्यासाठी गेवराई शहरातील लहान मुले, मुली, महिला, तरुण आणि वयोवृद्ध जनतेने उत्सफुर्त गर्दी केली होती. सायंकाळी सात वाजता स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आला.

यावेळी ॲड. सुभाष निकम म्हणाले की, शारदा प्रतिष्ठानच्या वतीने हा टिपरे महोत्सव अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आला. यावर्षी पारितोषिकांची रक्कम वाढवल्यामुळे कलाकारांत उत्साह संचारला आहे. विजयसिंह पंडित यांनी या कलेला प्रोत्साहन दिले आहे असेही ते म्हणाले.टिपरी स्पर्धेची सुरुवात धर्मविर संभाजी संघाने केली. यावेळी विविध मान्यवर आणि पदाधिकारीे कार्यकर्ते, महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *