गेवराईच्या सिंहाना शह देण्यासाठी शरदचंद्र पवार यांची गेवराईत ऐंन्ट्री
महाविकास आघाडीतील घटक पक्षातील माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना खा शरदचंद्र पवार ताकद देणार
बीड दि 16 ( वार्ताहार ) राजाच्या राजकारणात अनेक नाविन्य प्रयोग झाले राष्ट्रवादीतील अजित पवार यांनी पक्षासह आपणच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहोत असे जाहिर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक नविन समिकरण उभा राहिले आहे भाजप , शिवसेना ( शिंदे गट ) राष्ट्रवादी कॉंग्रेस ( अजित पवार गट ) हे समिकरण उभा राहिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्वेसर्वा खा शरदचंद्रजी पवार यांना हा मोठा धक्का मानला जात असताना गेवराईत खा शरदचंद्र पवार गटात कार्यकर्ते नाहीत तसेच स्थानिक राष्ट्रवादीचे माजी आ अमरसिंह पंडित यांनी अजित पवार गटात दाखल झाल्याने या ठिकाणी खा शरदचंद्र पवार गट अस्तिवात नाही. म्हणून महाविकास आघाडीतील घटक पक्षातील माजी राज्यमंत्री शिवसेना ( उद्धव बाळासाहे ठाकरे ) गटातील बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी खा शरदचंद्र पवार हे भेट देणार आहेत .या भेटीमुळे राजकीय तर्क वितर्क लावले जात आहेत
याबाबद सविस्तर माहिती अशी की, एकेकाळी गेवराई तालुक्याचे राजकारण पंडित परिवाराभोवती फिरत होते परंतू दोन्ही पंडित एकत्र आल्याने तिसऱ्या लक्ष्मण शक्तीचा उगम तालुक्याच्या राजकारणात झाला तसेच अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन सरकार मध्ये ऐंन्ट्री केल्यानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत तसेच बीड जिह्यात आ संदीप क्षीरसागर सोडता सगळेच आजी माजी आमदार हे अजित पवार गटात आहेत. म्हणून बीड जिल्ह्यात कार्यकर्ते कुणासोबत आहेत म्हणून बीड याठिकाणी खा शरदचंद्र पवार यांच्या सभेचे आयोजन येथे करण्यात आहे तसेच गेवराईच्या राजकारणातील चाणक्य असनाऱ्या माजी आ अमरसिंह पंडित यांना शह देण्यासाठी खा शरदचंद्र पवार हे महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटातील माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत तसेच आगामी काळात खा शरदचंद्र पवार हे निश्चित माजीमंत्री बदामराव पंडित यांना ताकद देण्याचे कार्य करतील तसेच घटक पक्षातील नेत्याच्या निवास्थानी भेट ही केवळ प्रोटोकॉल असू शकतो तसेच माजी मंत्री बदामराव पंडित सद्यस्थितीला कसलाही राजकीय निर्णय घेणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे. तसेच माजी आ अमरसिंह पंडित यांना शह देण्यासाठी खा शरदचंद्र पवार यांनी हालचाली सुरू केल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...