शिक्षकांची शाळेत दांडी ; गटशिक्षण अधिकारी कार्यलयात विद्यार्थी यांनी भरवली शाळा

माजी राजमंत्री बदामराव पंडित यांची आक्रमक भूमिका

 

गेवराई दि 8 ( वार्ताहार ) तालुक्यातील धूमेगाव याठिकाणी असनाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या अनेक महिन्यापासुन या ठिकाणी कार्यरत असनाऱ्या शिक्षकांने दांडी मारल्यामुळे विद्यार्थी व पालक यांनी आज ( दि 8 ऑगस्ट ) रोजी गेवराई या ठिकाणी असनाऱ्या गटशिक्षण अधिकारी यांच्या दालनासमोर शाळा भरवली होती .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , आर आर गायके यांची नियुक्ती धूमेगाव येथील प्राथमिक शाळेत आहे तसेच शाळा सुरू झाल्यापासुन फक्त या शिक्षकांने एक दिवस फक्त शाळेत आले आणि आजपर्यंत त्यांनी शाळेवर फिरकले देखिल नाहीत तसेच पालकांनी यांच्या अनेक तक्रारी स्थानिक आमदार व प्रशासनाकडे केल्या होत्या परंतू शिक्षक शाळेवर येत नसल्याने पालकांनी व विद्यार्थी यांना घेऊन गटशिक्षण अधिकारी यांच्या दालनासमोर शाळा भरवली तसेच या ठिकाणी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी भेट दिली व दोन दिवसात शाळेवर शिक्षक हजर न राहिल्यातर मी स्वत: पालकासमवेत आंदोलन करील व मी या प्रकरणी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगितले तसेच याठिकाणी स्थानिक आमदार यांचीही उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *