वक्तृत्व स्पर्धेत राक्षस भुवच्या कु. आर्या चौथाईवाले व कु.ऋतुजा पट्टे प्रथम

रणवीर पंडित यांच्या उपस्थितीत पारितोषिके प्रदान

गेवराई दि.३ ( वार्ताहार ) जयभवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थाअंतर्गत आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालयात राक्षसभुवनच्या कु. आर्या चौथाईवाले हीने माध्यमिक गटात तर प्राथमिक गटातून कु.ऋतुजा पट्टे हीने प्रथम पारितोषिक प्राप्त केले असून युवानेते रणवीर पंडित यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

शारदा स्पोर्टस ॲकडमीचे संचालक रणवीर पंडित यांच्या संकल्पनेतून जयभवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थाअंतर्गत आयोजित केलेल्या शारदा ज्ञानोत्सव २०२३ वक्तृत्व स्पर्धेचे धोंडराई येथील माध्यमिक विद्यालयात आयोजन करण्यात आले होते.
या वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक व प्राथमिक गटात आयोजित करण्यात आली होती. भ्रमणध्वनी (मोबाइल) वापराचे फायदे व तोटे, वृक्षसंवर्धन – काळाची गरज, शेतकरी आत्महत्या – कारणे व उपाय आणि कोविडने आपल्याला काय दिले ? या विषयावर सहभागी स्पर्धकांनी आपले मत मांडले. या स्पर्धेत जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या एकूण १७ शाळेचे स्पर्धेक सहभागी झाले होते. माध्यमिक गटातून माध्यमिक विद्यालय राक्षसभुवनच्या कु. आर्या चौथाईवाले हीने प्रथम तर माध्यमिक विद्यालय पाचेगावच्या कु. आरती डरफे हीने द्वितीय आणि तर तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालयाच्या कु. प्रगती मरकड हीने पटकावला. प्राथमिक गटातून माध्यमिक विद्यालया राक्षसभुवनच्या कु. ऋतुजा पट्टे हीने प्रथम तर शिवाजी विद्यालय मालेगावच्या कु. भक्ती खराद हीने द्वितीय आणि तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय धोंडराईच्या कु. जुनेरा काझी हीने मिळवला.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा‌. डॉ. बापु घोक्षे, प्रकाश भुते यांनी काम पाहिले.

सर्व यशस्वी स्पर्धकांना युवानेते रणवीर पंडित यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण नवले, बाजार समितीचे संचालक रमेश साखरे, धोंडराईच्या सरपंच कु. शितलताई साखरे, उपसरपंच बद्री जाधव, राहुल खरात, भास्कर खरात, युवानेते अक्षय खरात, संतोष जाधव, अजिम इनामदार, रवी खरात, अजहर भाई, प्रदीप गर्कळ, रामराव काकडे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, सहप्रशासनाधिकारी प्रा. काशिनाथ गोगुले यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक भक्तराज पौळ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पाठक यांनी केले तर आभार पिसाळ सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *