जयभवानी शिक्षण संस्थेचा कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांमुळे नावलौकिक वाढला – रणवीर पंडित

जयभवानी शिक्षण संकूलात राजेंद्र तिपाले यांचा सेवापूर्ती समारंभ थाटात संपन्न

गेवराई दि १ ( वार्ताहार ) जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाला प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचारी मिळाल्यामुळे संस्थेचे नाव मोठे झाले असून संस्असून संस्थेचा नावलौकिक वाढला असून संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, याचे सर्व श्रेय कर्मचाऱ्यांना जात आहे. आदरणीय शिवाजीराव दादांच्या काळात नौकरीला लागलेल्या या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे काम खुप मोठे आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे अशा शब्दात रणवीर अमरसिंह पंडित यांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला. जयभवानी विद्यालयातील लिपीक तथा ग्रंथपाल राजेंद्र तिपाले यांच्या सेवापूर्ती समारंभा ते बोलत होते.

शिवाजीनगर गढी येथील जयभवानी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील ग्रंथपाल राजेंद्र तिपाले हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाले, त्यांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून युवानेते रणवीर अमरसिंह पंडित, हिरापूरचे सरपंच बाबुराव पवार, उपसरपंच अमजद पठाण, रांजणीचे सरपंच आसाराम रोडगे, दत्तात्रय तिपाले, बाबुराव सावंत, जयभवानी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, सहप्रशासनाधिकारी प्रा.काशिनाथ गोगुले, प्राचार्य सदाशिव सरकटे, प्राचार्य वसंतराव राठोड, उपप्राचार्य रणजीत सानप यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात राजेंद्र तिपाले व सौ. मिलनताई तिपाले यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक हरिभाऊ हाकाळे यांनी केले. प्रा.आनंद बडवे, प्राचार्य वसंतराव राठोड, प्रमोद गोरकर यांनीही आपल्या मनोगतात राजेंद्र तिपाले यांच्या वक्तशिर आणि प्रामाणिक सेवेचे कौतुक केले. राजेंद्र तिपाले सत्काराला उत्तर देताना म्हणाली की, आदरणीय दादांच्या आशीर्वादाने मला जय भवानी शिक्षण संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. सेवेच्या ३३ वर्षांमध्ये मी सहकाऱ्यांच्या सहकार्याने उत्तम पद्धतीने काम करू शकलो असे सांगून या पुढील काळातही आपण जयभवानी आणि जगदंबा परिवार तसेच शिवछत्र परिवाराशी एकनिष्ठ राहु असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेतील विविध शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, मित्र परिवारांनी राजेंद्र तिपाले यांचा सेवापूर्ती बद्दल सपत्नीक सत्कार केला. जयभवानी विद्यालय शिवाजीनगर व जयभवानी जुनियर कॉलेजच्या वतीने आहेर आणि भेटवस्तू देऊन राजेंद्र तिपाले यांचा यावेळी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत बडे यांनी केले तर उपस्थित आमचे आभार प्रा. सत्यप्रेम लगड यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक कैलास गायकवाड आणि संस्थेचे माजी कर्मचारी प्रकाश प्रकाश, नरोटे, मुख्य लिपीक राजेंद्र गर्कळ, अनिकेत कांडेकर, संतोष ढाकणे यांच्सयासह सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी तिपाल यांचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता‌. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *