खडतर परिस्थितीवर मात करुन शेतकऱ्यांची मुलगी झाली सि.ए.
भाटेपुरीच्या आश्विनी बहिरचे सिएच्या परीक्षेत घवघवीत यश
गेवराई : दि ७ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील भाटेपुरी येथील शेतकरी कुटुंबातील रुस्तुम बहिर यांची कन्या कु.अश्विनी रुस्तुम बहिर हिने खडतर परिस्थितीवर मात करुन सीएची पदवी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आहे. अश्विनीने सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इच्छा शक्ती आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर साध्य करून दाखवले असून घवघवीत यश संपादन केले आहे.तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करुन अभिनंदन होत आहे.
सिए पदवी परिक्षेचा नुकताच दि. ५ जुलै २०२३ रोजी निकाल जाहीर झाला असून यामध्ये गेवराई तालुक्यातील भाटेपुरीच्या कु.अश्विनी रुस्तुम बहिर हिने सी.ए.च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होवून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. कु.आश्विनी बहिर हिचे आजोबा पाराजी बहिर, मामा विठ्ठल इंदुरे, बप्पा इंदुरे, चुलते मल्हारी बहिर, विष्णू बहिर,जयराम बहिर, उमेश मिरकड यांनी अभिनंदन करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...