April 19, 2025

बीड जिल्ह्यात नोकरी करणं म्हणजे विद्यापिठातुन पदवी प्राप्त करणं

साहय्यक पोलीस आयुक्त स्वप्नील राठोड यांचे प्रतिपादन

गेवराई दि .28 ( वार्ताहार ) बीड जिल्ह्यातील राजकीय , सामाजिक परिस्थीती पाहता व ती हातळतांना अधीकारी यांना जो अनूभव येतो तो अनुभव एखाद्या विद्यापिठात पदवीचे शिक्षण घेण्यासारखा असतो मात्र बीड जिल्ह्यात काम करूण जाणं आणि खास करूण गेवराई सारख्या ठिकाणी काम करूण जाणं म्हणजे विद्यापिठातून पदवी प्राप्त करण्यासारख आहे आणि ती पदवी मी मिळवली आहे असे प्रतिपादन गेवराईचे तत्कालिन उपअधीक्षक व औंरगाबाद येथील नुतन साहाय्यक पोलीस आयुक्त स्वप्नील राठोड यांनी केले आहे .

गेवराईचे उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांची नुकतीच औंरगाबाद शहर याठिकाणी साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे त्यांचा आज ( दि 28 रोजी ) निरोप सभारंभ उपविभागीय अधिकारी कार्यलयात मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते .यावेळी व्यासपिठावर गेवराई पोलीस निरीक्षक धनंजय फराटे,माजी राज्यमंत्री बदामराव पंडित,नायब तहसिलदार प्रशांत जाधवर,पत्रकार संघाचे अध्यक्ष मधूकर तौर ,चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकशिंगे,यांची उपस्थिती होती .

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मी अनेक ठिकाणी नोकरी केली पंरतू माझ्या आयुष्यात मी कसल्याही प्रकारे अंहकार ठेवला नाही गरीब, श्रीमंत यात कसलाही भेदभाव केला नाही. कायद्याच्या चौकटीत काम करत असतांना सर्व सामान्याचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर त्यांचे समाधान करणे फार गरजेचं असते पोलीस कर्मचारी यांनी काम करत असतांना आपला अंहकार बाजूला ठेवून काम कराव निश्चित यात समाधान मिळेल कुठलीही अडचन येणार नाही मी गेवराई तालुक्यात चार वर्ष सेवा दिली व मी सदैव बीड जिल्हा आणि गेवराई तालुक्याच्या जनतेचा ऋणी राहील व बीड जिल्हात नोकरी करणं म्हणजे विद्यापिठात पदवी प्राप्त करणं आहे आणि ती पदवी मी मिळवली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी गेवराई,चकलांबा, तलवाडा,येथील पोलिस कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते,वकील,डॉक्टर,पत्रकार,यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *