गेवराई दि ६ ( वार्ताहार ) तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील एका धाब्याजवळ एका विस वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला असल्याने मोठी खळबळ उडाली होती नातेवाईक यांनी काही तास मयताचे शवविछेदन रोखले होते परंतू घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उप अधीक्षक स्वप्नील राठोड यांनी या प्रकरणात तात्काळ गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले व या प्रकरणी चार जणांविरूद्ध तलवाडा पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल केला असुन यातील दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , रामेश्वर ज्ञानेश्वर राठोड ( वय १९ वर्ष ) राहणार पोईतांडा तालुका गेवराई जिल्हा बीड असे मयताचे नाव असुन ( दि ५ रोजी )अकरा वाजण्याच्या दरम्यान या तरूणाला मित्राने जेवण करण्यासाठी बोलविले होते व हा जेवण करण्यासाठी गेल्यानंतर रात्री घरी परतलाच नाही ( दि ६ रोजी ) सकाळी पाहटे या तरूणाचा मृत्युदेह एका धाब्याजवळ मृत अवस्थेत मिळून आला होता तलवाडा पोलिसांनी तात्काळ घटना स्तळावर धाव घेतली परंतू तो पर्यत या मयत तरूणाला त्यांच्याच एका मित्राने उपजिल्हा रूग्णालयात आनले होते डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषीत केले परंतू मयताच्या नातेवाईक यांनी आमच्या मुलाचा खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला होता उपजिल्हा रूग्णालय गेवराई याठिकाणी मोठी गर्दी झाली होती या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करूण आरोपी ताब्यात घ्या तोपर्यंत मयतावर शवविछेदन करायचे नाही व प्रेत ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा मयताच्या नातेवाईक यांनी घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ खूनाचा गून्हा दाखल केला व दोन आरोपी ताब्यात घेतले व दोन आरोपी अद्याप फरार असुन त्यांना पकडण्यासाठी तलवाडा पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती असुन या प्रकरणाचा पुढील तपास उप अधीक्षक स्वप्नील राठोड हे करत आहेत .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...