भिमज्योती जन्मोउत्सव समितीच्या अध्यक्षपदी अरूण मस्के यांची निवड
गेवराई दि २४ ( वार्ताहार )
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी गेवराई शहरात भिमज्योती जन्मउत्सव मोठ्या थाटात होणार आहे तसेच गतवर्षी चे अध्यक्ष महेश दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली नप सभागृहात बैठक संपन्न झाली यामध्ये भिमज्योती उत्सवाच्या अध्यक्षपदी नगर सेवक अरुण मस्के यांची निवड करण्यात आली आहे .
गेवराई शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीसुर्य जोतिबा फूले यांची सार्वजानिक जंयती उत्सव साजरा करण्यात येतो तसेच परपंरे नुसार या भिमज्योती जन्मउत्सवाचा अध्यक्ष ईतर समाजाचा असतो तसेच या कार्यकरणी साठी गेवराई शहरातील सर्वजाती धर्मातील तसेच सामाजिक कार्यात असनारे पदअधिकारी यांची बैठक माजी नगर अध्यक्ष महेश दाभाडे यांच्या अध्यतेखाली बोलावण्यात आली होती तसेच यावेळी नगर सेवक अरूण म्हस्के यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष पदी विलास सुतार , रविंद्र बोराडे , सचिव प्रभाकर पिसाळ , कार्यअध्यक्षपदी दत्ता दाभाडे ,सहसचिव दादासाहेब गिरी , कोषाअध्यक्ष सोहेल पठाण , सहकोषाअध्यक्ष पदी संदीप मडके , सल्लागार पदी याहिया खान , सह सल्लागार पदी जेडी शहा , प्रसिद्धी प्रमुख पदी मधूकर तौर , आयुब बागवान , सुभाष सुतार , यांची निवड करण्यात आली असुन या बैठकीला गेवराई शहरातील असंख्य कार्यकर्ते भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...