कुंभारवाडी येथे राहत्या घरातून गांजा विक्री सुरु केल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास छापा मारत एकास ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी १० किलो गांजा जप्त केला. दादासाहेब रंगनाथ जाधव ( वय ३०वर्ष ) असे आरोपीचे नाव आहे.
गेवराई ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांना खबऱ्यामार्फत कुंभारवाडी येथे दादासाहेब जाधव याने घरात गांजाचा साठ केल्याची माहिती मिळाली. यावरून आज सकाळी पोलिसांनी जाधवच्या घरावर छापा मारला. ४८,१४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी आरोपी जाधवला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर, अमोल खटाने, संतोष गाडे,जितेंद्र ओव्हळ, गर्जे,देवडे, परजने, नितीन राठोड, गुजर, यादव यांनी केली. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ हे करत आहेत.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...