मंगलनाथ मल्टीस्टेचा परवाना रद्द करा डीपीआयची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

बीड दि २१ ( वार्ताहार ) बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील एकाव्यक्तीने खाजगी बँकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली आहे तसेच याप्रकरणी धारूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे परंतू त्यामध्ये एॅट्रासिटी प्रमाणे गुन्हा दाखल करावा व संबंधित बँकेचा परवाना रद्द करावा अश्या मागणीचे निवेदन डीपीआय पक्षाच्या वतिने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की ,नितीन लक्ष्मण पाटोळे ( वय ४५वर्ष ) राहणार आसरडोह ता माजलगाव जिल्हा बीड असे या मयत शिक्षकांचे नाव वरील शिक्षक ह्याकडे धारूर येथील मंगलनाथ मल्टीस्टेटचे कर्ज होते तसेच या बँकेतील कर्मचारी यांनी वरील शिक्षकास जातीवाचक बोलून आपानास्पद वागनूक दिली होती म्हणून शिक्षकांने आपले जिवन गळफास घेऊन संपवले या प्रकरणी धारूर पोलिसांत गून्हाही दाखल झाला परंतू यामध्ये एॅट्रासिटीचे कलम वळगले आहे तसेच याप्रणात दोषी असलेले संचालक , व्यवस्थापक यांच्या विरूद्ध हा गून्हा नोंद करावा व सदरील मंगलनाथ मल्टीस्टेटचा परवाना रद्द करावा अश्या मागणीचे निवेदन डीपीआयच्या वतिने जिल्हाअध्यक्ष अमोल शेरकर , सुभाष लोनके , सुनिल पाटोळे , यांच्यासह आदीनी दिले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *