माधवी शरदराव कुलकर्णीचे सी.ए. फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश

गेवराई दि १४ ( वार्ताहार )गेवराई येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.डी.एम.कुलकर्णी यांची नात व विधीज्ञ ॲड.शरद कुलकर्णी यांची सुकन्या हिने नुकत्याच झालेल्या अत्यंत कठीण अशा चार्टर्ड अकाउंट फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

माधवी कुलकर्णी हिने अथक परिश्रम व आपल्या आई-वडिलांचे मार्गदर्शन तसेच अकॅडमी क्लासेसच्या मार्गदर्शनाने प्रथम प्रयत्नातच चार्टर्ड अकाउंट फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.माधवी कुलकर्णी हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण गेवराई येथील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल येथे झाले असून त्यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण हे बलभीम कॉलेज बीड येथे झाले आहे.इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर माधवी हिने चार्टर्ड अकाउंटंट या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला व चार्टर्ड अकाउंटंटच्या प्रथम वर्षाच्या फाउंडेशनच्या परीक्षेत माधवी कुलकर्णी हिने प्रथम प्रयत्नातच यश प्राप्त केले आहे.
माधवी कुलकर्णीच्या यशाबद्दल गेवराईचे मा.नगराध्यक्ष सुशील जवंजाळ,मा.उपनगराध्यक्ष ॲड.राजेंद्र राक्षसभुवनकर, मा.नगराध्यक्ष राधेश्याम अट्टल, गेवराई वकील संघाचे अध्यक्ष अमित मुळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे गेवराई वकील संघाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे तसेच बबनरावजी मुळे, मा.नगरसेवक कृष्णा मुळे, संदीप मुळे, डॉ.हेमंत वैद्य, संपादक अमोल वैद्य, शिवकेशर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब बेदरे, सहयोग मल्टीस्टेटचे चेअरमन डिगांबर टेकाळे , महेश अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्ये साहेब, इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ.बांगर साहेब, बलभीम महाविद्यालय बीड येथील प्राचार्य व समस्त शिक्षक वृंद तसेच गेवराई शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती इत्यादींनी अभिनंदन केले.माधवीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *