गेवराई दि १२ ( वार्ताहार ) शहरातील संजय नगर भागातील रहिवासी असलेल्या एका युवकाला आज्ञात कारणासाठी त्यांचे अपहरण करूण पळवले आहे या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी , भागवत कल्याण पैठणे ( वय ३३ वर्ष ) राहनार संजय नगर गेवराई असे या अपहरण झालेल्या युवकांचे नाव असुन सदरील युवक हा आपला चारचाकी टाटा एसी टॅम्पो चालवून आपली उपजिवीका भागवतो तसेच ( दि १० ) राहत्या घरासमोर एक अनओळखी ईसम आला तसेच तुमचा टेम्पो भाड्याने पाहिजे असे सांगितले तसेच तो व्यक्ती वरील युवकास टेम्पो समवेत निघून गेला परंतू खूप उशीर झाला असल्याने त्याला संपर्क केला असता त्यांचा मोबाईलवर दूसराच व्यक्ती बोलत होता तसेच या तरूणांचे अपहरण झाले असल्याचे बाब लक्षात येताच या प्रकरणी बालाजी काळे यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन गेवराई पोलिस पुढील तपास करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...