विषारी औषध प्राषन करून एकाची आत्महत्या

गेवराई दि २२ ( वार्ताहार ) शहरातील संजय नगर भागात रहीवासी असलेल्या एका तरूणांच्या घरी न्यायालयाचे समन्स घरावर डकवण्यासाठी काही पोलिस कर्मचारी गेले होते त्याठिकाणी या तरूणाची पोलिसा सोबत बाचाबाची झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यानंतर त्यांने विष प्राषन केले व आज ( दि २२ रोजी ) त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , आनंद उर्फ वाघ्या शेरू भोसले ( वय २६ वर्ष ) राहणार संजय नगर गेवराई जिल्हा बीड असे मयताचे नाव आहे गेल्या पाच दिवसांपुर्वी या युवकांच्या राहत्या घरी पोलिस न्यायालयाने दिलेले समन्स डकवविण्यासाठी गेले होते अशी माहिती असुन त्यानंतर वरील युवकांने विष प्राषन केले व गेल्या चार दिवसांपासुन त्याच्यांवर बीड येथील खाजगी रूग्णालयात उपचार सूरू होते त्यानंतर आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच मयताच्या नातेवाईक यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत तसेच या प्रकरणी काय ? कार्यवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .तसेच आत्महत्या केलेल्या युवकांवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे मयताच्या नातेवाई यांनी पोलिस अधीक्षक कार्यलयासमोर ठिय्या मांडला असुन दूपारपर्यंत या मयताचे शवविछेदन झाले नव्हते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *