गेवराई दि २१ ( वार्ताहार ) शहरातील कुरेशी मोहल्ला या ठिकाणी रहीवासी असलेल्या एका युवकांने सकाळी खाजगी सावरकी व कर्जपाई विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच युवकांला तात्काळ स्थानिक लोकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , आसेफ ईसुफ कुरेशी ( वय २८ वर्ष ) राहणार गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड असे या युवकांचे नाव आहे याकडे गेवराई शहरातील खाजगी सावकार , महिला बचत गट , खाजगी मल्टीस्टेट बँक असे मिळून लाखों रुपयाचे कर्ज असल्याची माहिती या युवकांच्या नातेवाईकांनी दिली तसेच दररोज हे खाजगी सावकार यांनी पैश्यासाठी तगादा लावला होता याच नैराशातून या युवकांने आज ( दि २१ रोजी ) सकाळी विषारी औषध प्राशन केले तसेच या युवकांला तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतू प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करूण बीड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असुन त्यांने विष प्राशन करण्याआगोदर सुसाईट नोट लिहून ठेवली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे .
संबंधीत युवकांचा व्हिडीओ पहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लीक करा
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...