बीड दि १७ ( वार्ताहार ) गेवराई शहरातील गणेश नगर भागात रहीवासी असलेले भवानी बँकेचे व्यवस्थापक त्यांच्या घरावर शसस्त्र दरोडा टाकण्यात आला होता यामध्ये घाडगे दाम्पत्य यांची निर्घृन हत्या करण्यात आली होती तसेच या घटनेत त्यांची मलगी गंभीर जखमी झाली होती परंतू तिचाही सहामहिन्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता तसेच या प्रकरणात आज ( दि १७ रोजी ) जिल्हा प्रमुख न्यायालने दोन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , मयत आदीनाथ उत्तम घाडगे ( वय ४८ वर्ष ) अलका अदीनाथ घाडगे पत्नी ( वय ४३ वर्ष ) वर्षा संदीप घाडगे (वय ३१ वर्ष ) ( मुलीगी ) सर्व राहणार गणेश नगर गेवराई दि २३ / ८ / २०१७ रोजी मध्यरात्री दोन आरोपीनी दरोडा टाकण्यात आला होता यामध्ये वरील घाडगे दाम्पत्य यांचा जागिच मृत्यू झाला होता तसेच या घटनेमुळे संपुर्ण गेवराई शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते तत्कालीन पोलिस आधीक्षक गोंविद राजन श्रिधर हे दोन दिवस गेवराई शहरात तळ ठोकूण होते तसेच बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफितीने १) सोमा शेरू भोसले राहनार केकतपागंरी तालुका गेवराई जिल्हा बीड २ ) लखन प्रताप भोसले राहणार कवडगांव घाडा तालुका परळी जिल्हा बीड असे या दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या तसेच या प्रकरणाचा तपास तत्कालीन उप विभागीय अधिकारी डॉ अर्जून भोसले यांनी केला होता व दोषारोपत्र न्यायलयात दाखल केले होते तसेच या घटनेतील मुख्य साक्षीदार वर्षा संदीप जाधव हीचा घटनेनंतर आठ महिन्यानंतर मृत्यू झाला होता तसेच या प्रकरणी जिल्हा प्रमुख न्यायमुर्ती एच जी महाजन यांच्या न्यायालयात आज ( दि १७ रोजी ) अंतिम सुनावणी झाली या प्रकरणात एकूण २२ साक्षीदार तपासण्यात आले तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जून भोसले यांची साक्ष महत्वाची ठरली तसेच एस वाय गलधर यांनी त्यांना तपासात मदत केली सदरच्या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतिने विधिज्ञ अजय राख यांनी भक्कम बाजू मांडली तसेच दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमुर्ती एच जी महाजन यांनी वरील आरोपीना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...