दूचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस गेली खड्यात; पाच प्रवाशी जखमी
गेवराई, दि १२ ( वार्ताहार ) – गेवराईहून नालासोपारा मुंबईकडे जाणाऱ्या एसटीबस समोर दुचाकीस्वार आल्याने, बस चालकाने त्याला वाचवितांना सदरील बस रस्त्यालगत एका खड्ड्यात गेली.सदरील घटनेत जिवीतहाणी झाली नसून .माञचालक,दुचाकीस्वार व तीन प्रवाशी असे एकूण पाच जण किरकोळ जखमी झाले असुन त्यांच्यावर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सदरील अपघाताची घटना आज गुरुवार रोजी सकाळी ९ च्या सुमारास तालुक्यातील उमापूर रोडवरील माऊली फाटा येथे घडली आहे.
गेवराई बसस्थानकातून गुरुवार ( दि.१२ रोजी ) सकाळी साडेआठ वाजता गेवराई ते नालासोपारा मुंबईकडे एसटीबस निघाली होती.तालुक्यातील उमापूर रोडवरील माऊली फाटा या दरम्यान अचानक दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचविण्यात सदरील बस रस्त्यालगत आसलेल्या खड्ड्यात गेली.या घटनेत बसमधील चालकांसह चार प्रवाशी व दुचाकीस्वार असे एकूण पाच प्रवाशी जखमी झाले आहेत.या जखमी प्रवाशांना उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.यातील दोन जणांना पुढील उपरार्थ बीडला हलविण्यात आले आहे.चालकाच्या सावधानामुळे अनर्थ टळला.गेवराई रुग्णालयात उपचार करणा-या प्रवेशांना एसटी महामंडळातील कोणताही वरिष्ठ आधिकारी दुपारी १२ पर्यंत भेट देण्यासाठी न आल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.या अपघातात एसटीचे व दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...