April 19, 2025

डिजिटल मिडियाचा सामाजिक उपक्रम; दर्पनदिनी मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

डीवायएसपी राठोड यांच्याकडून सामाजिक उपक्रमाचे कौतुक;पेन भेट देवून केला पत्रकारांचा सन्मान

गेवराई दि ७ ( वार्ताहार ) मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मिडिया परिषद गेवराई तालुका यांच्या वतीने दर्पनदिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि.६ जानेवारी रोजी कै.भगवानराव ढोबळे मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करुन स्तुत्य अन् सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक राठोड यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करुन पत्रकारांना पेन भेट देऊन दर्पण दिनाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, शिवसंग्राम नेते कैलास माने, पंचायत समिती सदस्य शामराव कुंड,शाळेचे मुख्याध्यापक माणिकराव रणबावळे यांच्यासह आदि राजकीय, सामाजिक,शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना डिजिटल मिडियाचे तालुकाध्यक्ष अविनाश इंगावले यांनी बोलताना सांगितले की डिजिटल मिडिया परिषद ही संघटना पत्रकारांच्या प्रश्नासाठी कायम तत्पर राहील तसेच समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीचा आमचा कायम लढा असणार आहे. तसेच मूकबधिर व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी दोन महिन्यात एलसिडी भेट देण्याचा शब्दही त्यांनी शेवटी बोलताना दिला.तर मनसे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोटे म्हणाले की कॉलेजपासून मनसे जिल्हाध्यक्ष पदापर्यंत वेळोवेळी पत्रकार बांधवांनी नेहमीच सहकार्य केले असल्याचे मत व्यक्त करत दर्पण दिनानिमित्त पत्रकार यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.यावेळी डिजिटल मिडियाचे पदाधिकारी सुभाष शिंदे, देवराज कोळे, शाम जाधव, ज्ञानेश्वर हवाले, शेख जावेद, अमोल भांगे, ज्ञानेश्वर मुंढे, गणेश ढाकणे, अफरोज शेख, इम्रान सौदागर, गोपाल चव्हाण तसेच मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन विनोद पौळ यांनी तर आभार सोमनाथ मोटे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *