गेवराई दि ३ ( वार्ताहार ) शेतकरी यांच्याशी व सर्वसामान्य नागरिक यांच्याशी निगडीत असनाऱ्या दूय्यम निबंधक कार्यलयात चक्क जनतेच्या खिश्यावर दरोडा टाकला जातोय अशी माहिती जगजाहिर करूण यांचे फ्लेक्स कार्यलया बाहेर लाऊन जनजागृती करण्यात आली आहे. मनसे चे जिल्हाध्यक्ष यांनी लावलेल्या या फ्लेक्सची शासन दखल घेणार का?असा प्रश्न यानिमित्ताने केला जात आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की,अनेक शेतकरी,सर्वसामान्य नागरिक आपली शेती किंवा प्लॉट खरेदी विक्री करण्यासाठी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यलयात त्यांची रितसर खरेदीचे दस्ताऐवज तयार करण्यासाठी जातो यामध्ये नातेवाईक ईतर गावांतून येणारे किंवा ईतर शहरातून एक दिवस वेळ काढून येतात आणि या कार्यलयात सांगितले जाते की सरोवर बंद पडले आहे तुमचा नंबर ऊद्या येईल.असे सांगताच अनेकांचे व्यवहार अडचणीत येतात आणि तो म्हणतो साहेब काहीही करा पण यातून मार्ग काढा नातेवाईक बाहेर गावांतून आले आहेत त्याठिकाणी असनारा दस्तूर लेखक म्हणतो थांबा साहेबांंना विचारतो मग तो पाच मिनीट रजिस्टारच्या केबिन मध्ये जाऊन रजिस्टार चा खिसा गरम करायचा विषय बोलतो आणि लगेच संबधीत शेतकरी याला सांगतो साहेब ऐकत नव्हते बड्या शिताफितीने त्यांने पटवलं आहे पाच हजार रूपये वेगळे लागतील ? जमतंय तर सांगा व्यवहार तुटू नये किंवा पैश्याची नड असल्याने नाईलाजाने त्या खातेदाराला या कार्यलयात पैश्याची डिमान्डं पुर्ण करावीच लागते.
तसेच हे चित्र ऐवढ्यावरच थांबत नाही ऑनलाईन चलन , टाईपिंग , च्या नावावर वेगळी रक्कम वसुल केली जाते तसेच या कार्यलयातील प्रत्येक टेबलवर पैसे द्यावे लागतात विषेश म्हणजे या कार्यलयात सिसिटिव्ही कॅमेरे आहेत ते पण पुर्ण पणे बंद आहेत. या कार्यलयातील पाठीमागच्या खोलीत कार्यलय बंद करण्याच्या वेळेत रजिस्टार सर्व दस्तूर लेखक याचा हिशोब करतात आणि मग रवाना होतात याचं पितळ मनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी उघड केल असुन त्यांनी या कार्यलयासमोर फ्लेक्स लाऊन जनजागृती केली आहे या फ्लेक्स ची चर्चा अनेक नागरिक करत आहेत तसेच मनसे ने लावलेल्या फ्लेक्स ची शासन दखल घेणार का?अशी चर्चा जनसामान्यातून होत आहे तसेच या प्रकरणी गेवराईचे रजिस्टार यांना याबाबद संपर्क केला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही .
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...