गेवराई दि २९ ( वार्ताहार ) शहरातील बसस्थानक परिसरात एका ७० वर्षिय वृध्द महिला हिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानं शहरात मोठी खळबळ माजली होती अवघ्या काही तासांतच बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने अटक केली आहे .तसेच याबाबद गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की , ज्ञानेश्वर लक्ष्मण घूबांर्डे ( वय ३१ वर्ष ) राहनार गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असुन याने गेवराई बसस्थानक परिसरात असलेल्या एका फळ विक्रेत्या ७० वर्षिय महिलेला एकटी पाहून तिच्यावर रात्री ४ वाजता त्यांने अत्याचार केला होता तसेच याघटनेमुळे गेवराई शहरात मोठी खळबळ उडाली होती पिडीतेला प्राथमिक उपचार करूण पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच वरील आरोपी हा या वयोवृध्द महिला हिच्या ओळखीचा होता तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने त्याला गेवराई शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातून अटक केली आहे या परिसरात असनाऱ्या एका खाजगी व्यावसाय करनाऱ्या दुकानाच्या सिसिटिव्ही फुटेज मध्ये आरोपी कैद झाला होता आरोपी यांच्याविरूद्ध यापुर्वी देखील बलात्काराचा गुन्हा पुणे याठिकाणी आहे व यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया गेवराई पोलिस ठाण्यात सुरू आहे .तसेच सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक , संजय तुपे , पोना अशोक दूबाले , कैलास ठोंबरे , नसीर शेख , राहूल शिंदे , चालक मराठे यांनी केली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...