तहसिलदार साहेब रात्रीच्या चाळीस गाड्याचा खेळ बंद करा;मग म्हणू कार्यवाई केली

 

तलाठी पाढंरे आणि मंडळअधिकारी लेंडाळ यांनी चाळीस हायवाची वसुली कुणासाठी केली ?


गेवराई दि ११ ( वार्ताहार ) गेवराई तालूक्यात रात्रीचा वाळू माफियांनी हैदोस घातला आहे तसेच तहसिलदार सचिन खाडे हे फक्त थातूर मातूर कार्यवाई करूण पाठ थोपटून घेत आहेत तसेच बीडच्या वाळू माफयांच्या चाळीस हायवा गाड्या गेल्या दोन महिन्यापासुन सुरू आहेत त्या कुनाच्या आर्शिवादामुळे तसेच तलाठी पाढंरे आणि मंडळ अधिकारी लेंडाळ यांनी चाळीस गाड्याची वसुली कुणासाठी? जमा केले याचं गणित जरा कळू द्या आधि त्या गाड्यावर कार्यवाई करा मग म्हणू कार्यवाई झाली .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेल्या दोन महिण्यापासुन गेवराई तालुक्यातील सावरगांव , राक्षसभूवन ( शनिचे ) म्हाळजपिंपळगांव , संगम जळगांव , खामगांव , सुरळेगांव , पाचांळेश्वर , या ठिकाणावरूण केनिच्या साह्याने हजारो ब्रास वाळू रात्रीच्या वेळी काढली जाते आणि त्यांची तस्करी चाळीस हायवा मार्फत केली जाते परंतू गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे हे मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली अशी परिस्तिथी भासवतात परंतू याच तहसिलदाराचे आदेशाने बीडच्या वाळू माफियांच्या चाळीस गाड्या सुरू आहेत त्यांच्यावर आधी कार्यवाई करा आणि वरूण किर्तन आतून तमाशा दाखावयाचे बंद करा तलाठी पाढंरे आणि मंडळ अधिकारी ह्या दोघांनी बीडच्या वाळू माफियांकडून वसुली केली आहे त्या गाड्यावर कार्यवाई करा आणि मग म्हणू कार्यवाई झाली यादीत नाव नसलेल्या लोकांच्या पाठीमागे पाडळशिंगी पर्यंत पळता आम्ही पुरावा देतो, हिंमत असेल तर त्यांना पकडून दाखवा थातूर मातूर कार्यवाई करूण जनतेची दिशा भूल करू नका आणि रात्रीच्या चालनाऱ्या या चाळीस गाड्याचा खेळ बंद करा हीच अपेक्षा गोदाकाठच्या नगरिकांना तूमच्याकडून आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *