धोंडराईच्या झोपडपट्टी येथील नागरिकांचा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार
धोंडराई दि ३० ( वार्ताहर ) एकिकडे ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून अनेक भावींनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे तर नामनिर्देशन पत्र भरण्याची तयारीही जोरात सुरू आहे असे असतानाच धोंडराई गावाजवळ असलेल्या झोपडपट्टी येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी याबाबद तहसिलदार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की ,धोंडराईच्या झोपडपट्टी भागात अनेक कुटुंब गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत.मात्र झोपडपट्टी भागात कोणत्याही मुलभुत सुविधां मिळत नसल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.झोपडपट्टी येथे मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे सांगत तेथील नागरिकांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.आमच्या भागात पिण्याचे पाणी,रस्ते,नाल्या, पुरेशी वीज यांसारख्या अनेक समस्या आहेत त्यामुळे आम्ही होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र धोंडराई येथील झोपडपट्टी भागातील नागरिकांनी तहसीलदार यांना दिले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या भागात कोणतेही विकास कामे झालेली नाहीत मग मतदान करायचेच कशाला असा संतप्त प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे झोपडपट्टी येथे राहणारे सर्वच लोक मजुर आहेत त्यांना फक्त मतदाना पुरतेच विचारात घेतले जात आहे असेच दिसुन येत आहे.तर तहिसलदार यांना दिलेल्या निवेदनात शंभर हुन अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...