April 19, 2025

अट्टल महाविद्यालयात रंग अंधत्व तपासणी  शिबिर संपन्न

गेवराई, दि. २३  ( वार्ताहार ) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथे  प्राणी शास्त्र विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने रंग अंधत्व तपासणी शिबिर महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.  

आजकाल सर्वच जण वाहतुकीसाठी वाहन  चालवत आहेत. सिग्नलचा लाल आणि हिरवा रंग हा रंग अंधत्व असलेल्या व्यक्ती ओळखू शकत नाहीत. वाहन चालक परवाना मिळविण्यासाठी तसेच सरकारी नोकरी मिळविण्यासाठीही ही तपासणी आवश्यक आहे’ असे भाष्य प्रमुख पाहुणे नेत्र शल्य चिकित्सक डॉ. राधेश्याम जाजू यांनी केले. या तपासणीचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपयोग होईल असे कार्यक्रमाच्या अध्यक्ष व महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. रजनी शिखरे यांनी सांगितले. यावेळी शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर  कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. या उपक्रमासाठी प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. मीना नागवंशी यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. वर्षा  जयसिंगपूरे यांनी केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडवे आणि डॉ. काळे यांनी सहभाग नोंदला. तसेच प्रा. नेतल कदम, वसतिगृहाच्या ज्योती खरात, आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *