April 19, 2025

क्षीरसागर कुटूंबियांना नैसर्गिक आपत्तीतून चार लक्ष रुपयांची मदत


गेवराई दि २२ ( वार्ताहार ) शहरातील रंगार चौकातील दोन वर्षाचा मुलगा नालीत पडून वाहून गेला असल्याची घटना ( दि २६ जून ) रोजी घडली होती त्या कुटूंबियांना नैसर्गिक आपत्ती विभागाकडून चार लक्ष रुपयांची मदत करण्यात आली आहे .

याबाबद सविस्तर माहिती अशी की , बंन्टी क्षीरसागर ( मयत ) हा मुलगा आपल्या मोठ्या भावाकडे रंगार चौकातील अंगनवाडीत गेला होता तसेच पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असतांना रस्ता ओंलाडून पडीकडे जात असताना रंगार चौकातील एका नालीत तो पडला आणि पुढे वाहून तसेल ही नाली समोर विद्रूपा नदीला जाऊन मिळत होती तब्बल विद्रूपा नदीत एक दिवस शोध मोहीम चालली होती त्यानंतर दूसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यूदेह मिळाला होता तसेच संपुर्ण गेवराई शहर या प्रकाराने हळहळ व्यक्त करत होते या पीडित कुटूंबियाला गेवराई स्थानिक महसुल प्रशासनातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून चार लक्ष रुपयांचा धनादेश तहसिलदार सचिन खाडे यांच्या हस्ते देण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *