April 19, 2025

राक्षसभूवन येथील दोन वाळू साठ्यांचे निलाव जाहिर 

निलाव रद्द करणेबाबद जूनेद बागवान यांची तक्रार 

गेवराई दि २१ ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन याठकाणाहून अनाधीकृत वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती तहसिलदार सचिन खाडे यांच्या मार्गदशनाखाली महसुल पथकांने याठिकाणी छापे मारी करूण ८७५ ब्रास वाळू साठ्यावर जप्तीची कार्यवाई करण्यात आली होती तसेच आज ( दि २१ रोजी ) तहसिल कार्यलयात तहसिलदार यांच्या उपस्थितीत सदरची दोन्ही साठ्याची निलाव प्रक्रीया पुर्ण झाली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की , राक्षसभूवन येथीथ शासकीय विश्रामगृह येथील जप्त वाळू साठा  ७५० ब्रास यांची शासकीय किंमत ४ लाख ५० हजार रूपये ऐवढी होती तसेच सर्वोच्च बोली लावून हा साठा ३३ लक्ष ८० हजार रूपयांत गेला आहे तसेच दूसरा साठा हा १२५ ब्रास राक्षसभूवन यांची शासकीय किंमत ७५ हजार रूपये ऐवढी होती तसेच सर्वोच बोली बोलून ५ लक्ष १० हजार रूपये ऐवढ्यात गेला आहे तसेच अन्यकर या दोन्ही साठ्यात वेगळ्या स्वरूपात राहतील  ऐवढ्या मोठ्या उच्च बोली लाऊन हे साठे गेले आहेत ४ हजार प्रति ब्रास च्या अधिक रकमेत सदरचे वाळू साठे गेले आहेत सदरच्या आयोजित केलेल्या निलाव प्रक्रीये १८ जणांनी सहभाग घेतला होता तसेच एका वाळू साठ्याच्या बोलीत फक्त एकदाच एका व्यक्तीने बोली बोलावी असा नियम महसुल प्रशासनाच्या वतिने ठेवण्यात आला होता तसेच सदरची निलाव प्रक्रीया सुरू असतांना जूनेद बागवान यांनी सदरच्या निलाव प्रक्रीयेवर अक्षेप सादर केला तसेच महसुल प्रशासनाने या निलावा बाबद कुठल्याही दोन वृत्तमान पत्रात यांची जाहिरात प्रसिद्ध केली नाही तसेच यामुळे शासनाने घालुन दिलेल्या अटीचा भंग झाला आहे म्हणून त्यांनी ही निलाव प्रक्यारी रद्द करण्याची मागणी त्यांनी तहसिलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे तसेच सदरची निलाव प्रक्रीया तहसिलदार सचिन खाडे , मंडळ अधिकारी सानप , उपनिरीक्षक भूतेकर , पेषकार मुळे , अवल कारकून श्रीमती गिरी , यांनी पार पाडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *