ग्रामसेवक सोपान मुसळे विरुद्ध खटला नोंदविण्याचे आदेश
गेवराई :दि १२ ( वार्ताहार ) बाग पिंपळगाव तालुका गेवराई येथील ग्रामसेवक सोपान नामदेव मुसळे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज करून मागितलेली माहिती दिली नाही. हे कृत्य भारतीय दंड संहितेच्या कलम 166 नुसार गुन्हा ठरते. या कारणाने त्यांच्याविरुद्ध संदेश शिवाजीराव पोतदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गेवराई येथील सन्माननीय ४थे न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग श्री ए. डी. कुलकर्णी यांनी खटला नोंदवून समन्स जारी करण्याचे आदेश दिले.
याबाबद सविस्तर माहिती अशी की , बाग पिंपळगाव येथील रहिवाशी संदेश पोतदार यांनी जानेवारी 2019 मध्ये बाग पिंपळगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांक 299 च्या पी टी आर उताऱ्यास झालेल्या नामांतरबाबतची माहिती मागितली. ग्रामसेवक मुसळे यांनी अशी माहिती दिली नाही म्हणून फिर्यादी संदेश पोतदार यांनी पंचायत समिती गेवराई येथील विस्तार अधिकाऱ्यांकडे पहिले अपील केले. हे अपील मंजूर होऊन 30 दिवसांच्या आत संदेश पोतदार यांना विनाशुल्क माहिती देण्याबाबत आदेश दिले.
पहिल्या अपिलात माहिती देण्याचा आदेश दिल्यानंतरही ग्रामसेवक सोपान नामदेव मुसळे यांनी संदेश पोतदार यांना त्यांनी मागितलेली माहिती दिली नाही. याविषयी नाराजीने संदेश पोतदार यांनी माननीय राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दुसरे अपील दाखल केले. माननीय राज्य माहिती आयोगाने दिनांक 13-03- 2020 रोजी संदेश पोतदार यांचे अपील मंजूर करून पंधरा दिवसात मागणी केलेली माहिती देण्याचे आदेश दिले. आपल्या निकालात सोपान नामदेव मुसळे यांनी माहिती का दिली नाही याबाबत तीस दिवसात आयोगा समक्ष हजर होऊन खुलासा करावा. अन्यथा माहिती कायद्याच्या कलम 20 प्रमाणे कारवाई कार्यवाही केली जाईल असेही आदेशित केले.
यानंतरही सोपान नामदेव मुसळे यांनी संदेश पोतदार यांना पंधरा दिवसात माहिती दिली नाही. त्यामुळे माहिती अधिकार कायद्यातील कलम 7 (1) मधील तरतुदीचा भंग केल्या कारणे. तसेच तीस दिवसात व्यक्तीश: हजर होऊन खुलासा केला नाही. म्हणून याच कायद्यातील कलम 20 नुसार कारवाई करण्यास पात्र ठरले यानंतर संदेश पोतदार यांनी पुनश्च माननीय राज्य माहिती आयोगाकडे माहिती न मिळाल्याने ग्रामसेवक मुसळे यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी दिनांक 26 06 2019 रोजी अर्ज देऊन केली. या अर्जावरून माननीय राज्य माहिती आयोगाने सोपान नामदेव मुसळे यास दहा हजार रुपये दंड ठोठावला.
याही परिस्थितीत आज पर्यंत सोपान नामदेव मुसळे यांनी संदेश पोतदार यांना मागणी केलेली माहिती दिली नाही म्हणून त्यांनी मुसळे यांच्याविरुद्ध गेवराई न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून माननीय न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग श्री ए. डी. कुलकर्णी यांनी आरोपी सोपान नामदेव मुसळे यांच्या विरुद्ध फौजदारी खटला नोंदवून न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावण्याचा आदेश दिला.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...