कॉफी शॉप अन् त्यातील भिषण वास्तव

गेवराई दि १० ( वार्ताहार )आज कालच्या युगात नविन तरूणाई व्यसनाधिन होत असतानांच नविन वास्तव समोर आले आहे हे म्हणजे कॉफी शॉप होय शाळा , खाजगी क्लासेस , महाविद्यालय आणि शहराच्या अवघ्या काही अंतरावर असे कॉफी शॉप चालत आहे तसेच यातील देखील भिषण वास्तव आहे ते म्हणजे या ठिकाणी दिवसाढवळ्या अनेक बलात्कार आणि विनयभंग होत आहेत .तरी अश्या कॉफी शॉफवर कार्यवाई करून ते बंद करावेत अशी मागणी ही होऊ लागली आहे .

आपल्या घरातील मुलगी किंवा मुलगा क्लासेस , किंवा कॉलेजला जातो तो काय ? करतो किंवा मुलगी ती काय ? करते यांचा थागंपथ्था देखील पालकांना नाही कारण ते समजतात आपले पाल्य शिक्षण घेण्यासाठी गेले तसे नाही नविन संस्कृतीत नवा ट्रेन्ड आहे अनेक मले मुली मित्र असतात त्यात प्रेम युगल देखील असतात मग ते भेटतात कसे ? ते ठिकाण कोणते असा प्रश्न अनेकांना पडतो आपल्याला जर कोणी पाहिलं तर यांची भिती देखील असते दररोजचा क्राईम दर ऐवढा वाढला की दररोज तालुक्यात अनेक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे याचं कारण असं अल्पवयीन तरूण किंवा अल्पवयीन तरूणी खाजगी क्लासेस ला गेल्यानंतर कॉफी शॉप मध्ये जातात कॉफी शॉप तिथं कॉफी मिळते असे नाही परंतू हे एक बलात्काराचं केंद्रे आहे यामध्ये गेल्यानंतर आतल्या हॉलमध्ये संपुर्ण अंधकार असतो बसण्यासाठी केलेल्या सिटचा बेड तयार होतो तसेच एक तासांचे सहाशे रूपये याचा चार्ज केला जातो या ठिकाणी अनेक अल्पवयीन मुलींवर विनयभंग किंवा बलात्कार केला जातो अनेक पालकांच्या याविषयी तक्रारी आल्या परंतू तक्रार देण्यास समोर आले नाहीत अब्रू जाईल असे अनेकांना वाटले याचं जिवंत उदारण एका अल्पवयीन तरूणीवर बीडच्या एका कॉफी शॉप मध्ये बलात्कार झाला आणि तीला मुलगाही झाला पोलिस प्रशासनाला विनंती आहे. गेवराई शहरात देखील असे कॉफीशॉप आहेत त्या ठिकाणी जाऊन पहा तिकडे चाललयं तरी काय ? अनेक तरूण तरूणींचे शिक्षण अंधकारात जात आहे त्याचे भविष्य अंधकारात आहे म्हणून अश्या कॉफी शॉप वर कार्यवाईची मागणी होऊ लागली आहे पोलिस प्रशासनाने यावर उपाय योजना करावी अशी अपेक्षा गेवराई करांना आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *