राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. आता ठाकरे गट किंवा शिंदे गटाला हे चिन्हा वापरता येणार नाही. अंधेरी पोटनिवडणूक आता धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही.
शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ठाकरे आणि शिंदे गटानं केलेल्या दाव्यांवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत तब्बल चार तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह इतर आयुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शिंदे आणि ठाकरे गटानं काल कागदपत्रे सादर केली होती.
संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा, मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध महाराष्ट्रात माध्यम स्वातंत्र्य धोक्यात आमदारच पत्रकारांना शिविगाळ...
मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मिडीया’चे योगदान मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत प्रतिपादन राज्यस्तरीय ‘उत्कृष्ठ जनसंपर्क...