गेवराई दि २४ ( वार्ताहार ) शहरातील दाभाडे गल्ली परिसरात राहणाऱ्या एका शिक्षीका असनाऱ्या ( ५५ वर्षीय ) महिलेलेला बक्षीस मिळाले असल्याचे बतावणी करून तसेच शहरात फिरवून एक लाखं रूपये किमंतीचे दागिने लपांस केली असल्याची घटना दुपारी बारा बाजण्याच्या सुमारास घडली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , आशाबाई दिलीप राऊत ( वय ५० वर्ष ) राहनार दाभाडे गल्ली गेवराई असे या दागिने पळवून नेलेल्या महिलेचे नाव असून त्या आश्रम शाळेत शिक्षक असल्याची माहिती आहे . सदर महिला घरी एकटीच असतांना त्याच संधीचा फायदा घेत आरोपी मोटार सायकलवर आला आणि सांगितले की तुमच्या कडील दागिन्यावर लोगो आहे आणि तुम्हाला बक्षीस मिळणार आहे तुम्ही माझ्यासोबत चला असे सांगितल्यानंतर या महिलेने आपले संपुर्ण एक लाखं रूपये किंमतचे दागिने त्या चोरट्याकडे दिले आणि त्यांच्या बाईकवर बसुन त्याने महिलेला माणिक हॉस्पिटल परिसरात सोडले त्याठिकाणी एक गाळ्याकडे हात करूण म्हणाला ऑफिस बंद आहे सदर महिलेने दागिने परत मागितले असता तुम्ही ईथेच थांबा मी साहेबांना घेऊन येतो म्हणून पोबारा केला सदरच्या महिलेला आपली फसवणुक झाली असल्याचे लक्षात येताच गेवराई पोलिसांत धाव घेतली व या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती डी बी पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे यांनी दिली आहे .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...