बीड दि. २३ ( वार्ताहार )- डोमरी प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीचा कलम १८ खालील वाढीव मावेजा न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास गांधीजयंतीला दि. २ ऑक्टोबर रोजी डोमरी प्रकल्पात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांना निवेदनाद्वारे दिला आहे.
डोमरी येथील प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा वाढीव मावेजा मिळावा याकरिता प्रकल्पग्रस्त पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. या प्रश्नावर प्रकल्पग्रस्तांनी यापूर्वी उपोषण केले होते. त्यावेळी मावेजा देण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आश्वासन संचालकांनी दिले होते. परंतु पुढे कार्यवाही झालेली नाही. या बाबत प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात बाजु मांडल्यानंतर न्यायालयाने देखील २००६ मध्ये वाढीव मावेजा मंजूर केला होता. परंतु सदर अर्जात कार्यकारी अभियंता यांना पार्टी न केल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अपील केले होते. सदर अपीलावर निर्णय होवून हा अर्ज जिल्हा न्यायालयाकडे फे र निर्णयासाठी वर्ग करण्यात आहे.
आले होते. त्यामध्ये न्यायालयाने दि. १९ जून २०१९ व दि.१९ ऑक्टोबर २०१९ मध्ये निर्णय देवून वाढीव मावेजा मंजूर केला आहे. तसेच याबाबत संचालक कार्यालयाकडून अपील दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्याप याबाबत उच्च न्यायालयाकडून प्रकल्पग्रस्तांना नोटीस प्राप्त झालेल्या नाहीत. याच प्रश्नावर आता दि. २ ऑक्टोबर रोजी प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा इशारा बाळु केशवराव ठोसर, लक्ष्मण साहेबराव ठोसर, कचरू साहेबराव ठोसर, भगवान रंगराव लोखंडे, शिवाजी रंगराव लोखंडे, भिमराव देवराव लोखंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...