April 19, 2025

आव्हाणे बुद्रुक येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त भव्य यात्रोत्सव

भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे – अध्यक्ष मालोजीराव भुसारी

गेवराई दि १२ ( वार्ताहार ) आव्हाणे बुद्रुक येथील श्रीक्षेत्र स्वयंभू निद्रिस्त गणपती मंदिरात मंगळवार दि.१३ रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीक्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर, आव्हाणे बु. येथे सकाळी ७ वाजता स्वयंभू मूर्तीस गंगास्नान व अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर बाबासाहेब चोथे, बापुराव भुसारी व श्रीकांत जोशी यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. सकाळी साडे दहा ते साडे बारा या वेळात परतूर (जि. जालना) येथील भागवताचार्य रुपाली सवणे यांचे किर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता भाविकांना फराळ व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजता तेलकुडगाव येथील आबासाहेब काळे यांच्या शुभहस्ते आरती व महाअभिषेक करण्यात येणार आहे. त्यांच्या वतीने रात्री साडे आठ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री दहानंतर आव्हाणे पंचक्रोशीतील एकतारी भजनी मंडळाचा जागराचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा व स्वयंभू गणरायाच्या दर्शनाचा भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन स्वयंभू गणपती देवस्थानचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *