जुन्याच पद्धतीने होणार बाजार समित्यांची निवडणूक

 

जिल्ह्यातील १० बाजार समित्यांचा समावेश

बीड दि.७ ( वार्ताहार ) : बाजार समितीच्या निवडणुकीत थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याबाबाबत चर्चा सुरु असतानाच आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जुन्या पद्धतीनेच बाजार समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, त्यानुसार राज्यातील संचालक मंडळाची मुदत संपलेल्या सर्वच बाजार समित्यांसाठी २९ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यात बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १० बाजार समित्यांचा समावेश आहे. यातून आता राजकीय नेतृत्वाचा कस लागणार आहे. बीड जिल्ह्यातील १० बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील बहुतांश बाजार समित्यांवर सध्या अशासकीय प्रशासक मंडळ किंवा प्रशासक आहेत. या बाजार समित्यांवर आपल्या मर्हजीतील अशासकीय मंडळ बसविण्यासाठी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी प्रयत्न सुरु जानेवारीमध्ये जुन्याच पद्धतीने होणार आहेत

राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत यापूर्वीच संपली आहे. मात्र कोरोनामुळे या बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यातच राज्यात शिंदे फडणवीसांचे सरकार आल्यानंतर बाजार समिती निवडणुकीत थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जुन्या पद्धतीने म्हणजेच ग्रामपंचायत आणि सेवा सोसायटी सदस्यांच्या मतदानाद्वारेच बाजार समित्यांची निवडणूक जाहीर केली आहे.

असा आहे कार्यक्रम

मतदारयादी अंतिम करणे : ७ डिसेंबर २२ निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे : २३ डिसेंबर २२ अर्ज भरणे : २३ ते २९ डिसेंबर छानणी : ३० डिसेंबर २२ माघार : १६ जानेवारी २३ मतदान : २९ जानेवारी २३ मतमोजणी : ३० जानेवारी २३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *