जाणिवपुर्वक विज पुरवठा सुरू त्या  ठेवल्यानं तिघांचा मृत्यू

गेवराई दि ५ ( वार्ताहार ) तालुक्यातील भेंड टाकळी या ठिकाणी ( दि ३ रोजी ) आईसह दोन मुले यांचा विद्यूत तारेचा धक्का बसुन दुर्दैवी अंत झाला होता या प्रकरणी मयताचा नवरा यांच्या विरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की ,ललीता श्रिकांत राठोड ( वय ३०वर्ष ) प्रशांत श्रिकांत राठोड ( वय ११वर्ष ) अभिजीत श्रिकांत राठोड ( वय ८ वर्ष ) सर्व राहणार भेंड टाकळी तांडा या तिघां आई व दोन मुलांचा विजेच्या धक्का लागल्याने मृत्यू झाला या प्रकरणी विज वितरण चा गलथान कारभार असे प्राथमिक लक्षात येत होते मात्र या तिघांचा जाणिवपुर्वक कट रचून यांना मरण्यास कारणीभूत ठरला असल्याची तक्रार तलवाडा पोलिसांत दाखल झाली आहे आरोपीने बांधाच्या कडेला असलेले चिंचाच्या झाडाच्या फांद्या विजेच्या पोलवर पडल्याने त्या तारा तुटल्या आहे असे बहिण व भाछे यांना न सांगता तसाच विज प्रवाह सुरू राहिल्याने त्यांना याचा धक्का लागला व ते मरण पावले त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कांता श्रीराम राठोड यांच्या विरूद्ध तलवाडा पोलिसांत कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपनिरीक्षक भंवर हे करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *