गौरी पुजनात स्त्री शक्तीचा जागर देखावा सादर

सौ. पल्लवी गोगुले यांनी दिला स्त्री शक्तीचा संदेश

गेवराई दि.४ ( वार्ताहार )  गौरी- गणपतीच्या सणाचे औचित्य साधून दरवर्षी सामाजिक संदेश देण्याचे काम सौ. पल्लवी काशिनाथ गोगुले करतात. यावर्षी त्यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅसाहेब, अहिल्याबाई होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व कल्पना चावला यांच्या प्रतिमेतच त्यांनी गौरीचे रूप दाखवले आहे. यातून नारी शक्तीचा संदेश गोगुले परिवाराने दिला.

माऊली नगर गेवराई येथील सौ. पल्लवी गोगुले यांनी स्त्रीशक्तीचा जागर हा देखावा सादर केला असून त्यामध्ये त्यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाई आंबेडकर व कल्पना चावला यांचे कार्य कसे अलौकिक स्वरूपाचे होते हे त्यांनी या देखाव्यातून दाखवून दिले. स्त्रीचे योगदान किती महत्त्वाचं होतं हे यातून लक्षात येतं. जिजाऊ माँसाहेब यांनी शिवबाला कसे धडे दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा काढली‌ झाशीची राणी यांना घोड्यावर स्वार होताना दाखवले. रमाई डॉक्टर आंबेडकरांच्या पाठीशी कशा खंबीरपणे उभ्या होत्या. अहिल्याबाईंनी राज्य कसे सांभाळले. कल्पना चावला चंद्रावर कशा गेल्या, याचा हुबेहूब देखावा त्यांनी सादर केला भिंतीवरील स्लोगन हे सुद्धा आकर्षित करत होते. गौरी गणपतीच्या सणाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागरआपल्या देखाव्यातून सादर केला आहे त्यामुळे सौ.गोगुले पल्लवी काशिनाथ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *