विजेच्या तारेला चिटकून दोन लेकरांसह आईचा जागीच मृत्यू;भेंड टाकळीतील हृदयद्रावक घटना
गेवराई दि ३ ( वार्ताहार ) गौरी आगमनाच्या दिवशीच म्हणजे दिनांक ( ३ सप्टेंबर रोजी ) गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी तांडा येथील राठोड कुटुंबावर नियतीने घाला घातला असून, विजेच्या तारेला चिटकून दोन लेकरांसह आईचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन राठोड कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी तांडा येथील महिला ललीता श्रीकात राठोड ( वय ३० वर्षे ) रा भेडटाकळी तांडा, मुलगा अभिजीत श्रीकांत राठोड ( वय ८ वर्षे ) आणि प्रशांत श्रीकांत राठोड ( वय ११ वर्षे ) यांचा घराजवळील तारेचा शॉक लागून या राठोड कुटुंबातील आई व दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक ३ सप्टेंबर रोजी गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी तांडा येथे घडली. गौरी आगमनाच्या दिवशीच राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत. दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती व त्यात शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी तात्काळ भेंडाळी तांडा येथे जाऊन राठोड परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला. सदर घटना घडली कशी ? याबाबत तात्काळ चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...