अत्याचार प्रकरणामध्ये कॉफी शॉप चालकाला केली अटक


गेवराई दि. ३ ( वार्ताहार ) : गेवराईतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बीड शहरातील तुळजाई चौकातील कॉपी शॉपमध्ये अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीसांनी आता कॉपी शॉप चालकालाही शुक्रवारी (दि. २) सायंकाळी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , सचिन भास्कर खाकरे (वाखनातपूर ता. बीड) असे कॉफी शॉप चालकाचे नाव आहे. त्याचे शहरातील तुळजाई चौकात कॉफी शॉप आहे. ( २९ ऑगस्ट रोजी ) रोहित अभिमान आठवले व सय्यद फरहान लतीफ (दोघे रा. कुक्कडगाव ता. गेवराई) यांनी गेवराई शहरात कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या १६ वर्षीय मुलीचे तोंडाला रुमाल बांधून अपहरण केले. त्यानंतर रोहित आठवलेने या कॉफी शॉपमध्ये आणून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन गेवराई पोलीस ठाण्यात रोहित अभिमान आठवले व सय्यद फरहान लतीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील रोहित आठवले यास अटक केल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान पीडिता ही सहा ते सात महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आता पोलीसांनी कॉफी शॉपच्या मालकास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहितीतपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *