ग्रामसेवकाने केला मतिमंद मुलीचा विनयभंग;गेवराई तालुक्यातील घटना
ग्रामसेवक ईस्माईल पठाण यांच्यावर गुन्हा दाखल
गेवराई दि १० ( वार्ताहार ) तालुक्यातील जोडवाडी सयदापुर या ग्रुप ग्रामपंचायतचा ग्रामसेवकांने एका ( २८ वर्षिय ) मतिमंद मुलीचा विनयभंग केला असल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फर्यादीवरूण चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
या बाबत सविस्तर माहिती अशी की , तालुक्यातील जोडवाडी याठिकाणी मतिमंद मुलगी पाणी आनण्यासाठी गेली होती घराच्या हाकेच्या अंतरावर असतांना गावंचे ग्रामसेवक हा मोटार सायकलवर आला व या मुलिचा विनयभंग केला तसेच या मुलीने आरडाओरड केली असता ग्रामसेवकांने त्या ठिकाणावरूण पळ काढला सदरचा घटनाक्रम पिडीतेेने तिच्या आईला सांगितला व त्यांनी या बाबत चकलांबा पोलिसांत धाव घेतली व ग्रामसेवक ईस्माईल वजिर पठाण यांच्या विरूद्ध चकलांंबा पोलिस ठाण्यात विनयभंग व अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत .
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...