मद्यधुंद चालकाचा रस्त्यावर थरार;अर्ध्यातासा नंतर जमावाने पकडले

गेवराई दि ७ ( वार्ताहार ) नादेंड कडून गेवराई कडे येत असतांना अर्धामसला येथून आपल्या तिन म्हशी रस्त्यावरून चालत असतांना समोरून येणाऱ्या कंन्टेनरने जोराची धडक दिली ऐवढ्यावरच तो चालक थांबला नाही रस्त्यावरून चालनाऱ्या किमान २० गाड्यानां याने कट मारूण जखमी केल्याची घटना ( दि ७ रोजी ) पाच वाजेदरम्यान घडली .

या बाबत सविस्तर माहिती अशी की ,टी एस ०७ युए ८६७८ या क्रंमाकाचा कंन्टेनरचा चालक मद्यधुंद अवस्थेत या राष्ट्रीय महामार्गावरू चालला होता अर्धा मसला या ठिकाणावरून आपल्या शेतातून घरी परतत असतांना अप्पा गोपिनाथ पवळे यांच्या तिन म्हशीनां या कंन्टेनरने जोराची धडक दिली व यामध्ये तिन म्हशीचा जागिच मृत्यू देखील झाला परंतू हा कंन्टेनर मोठ्या भरगाव वेगात चालला होती की समोरून येणाऱ्या किमान २० मोटार सायकल यांना कट मारून यांने किरकोळ जखमी केले तसेच रस्त्यावरील नागरिकांनी याला अडवले असता चालक मद्यधुंद अवस्थेत होता नागरिकांनी त्याला चोपही दिला घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्तळावर दाखल झाले व चालकाला अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती सहा , फो सुरेश पारधी यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *