बीड दि. २ ( वार्ताहार ) : बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी होत असल्याच्या ढिगाने तक्रारी होत असल्या तरी महसूल प्रशासन मात्र अशी तस्करी होत असल्याचे कधी मान्य करीत नाही, अगदी विधिमंडळाला देखील तस्करी होत नसल्याचे सांगितले जाते. मात्र आता खुद्द पोलीस अधीक्षकांनीच जिल्ह्यात अशी वाळूची तस्करी होत असून त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचा गोपनीय अहवाल पाठविल्याची माहिती आहे.. स्वतः पोलीस अधीक्षकांनीच असा अहवाल दिल्याने आता महसूल विभागाचे पितळ उघडे पडले आहे.