सासरच्या लोकांनी खुन केला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी राज्य महामार्ग आडवला

गेवराई दि ३१ ( वार्ताहार ) तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृत्यूदेह मिळून आला तसेच ही आत्महत्या नसुन खून आहे असा आरोप मयत मुलीच्या नातेवाईकांनी केला तसेच या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा म्हणत नातेवाईकांनी उमापुरचा राज्य महामार्ग एक तास रोखला व प्रेत ताब्यात घेण्यात नकार दिला असल्याची घटना( दि ३१ रोजी ) घडली .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , अंजली सुनिल राठोड ( वय २६ ) वर्ष हिचा विवाह सात वर्षापुर्वी सुनिल किसन राठोड यांच्या सोबत झाला होता तसेच सासरची मंडळी वरिल विवाहतेला मानसिक , व शारीरीक , छळ करत होते असे अनेकदा मयतांने आपल्या माहेरी सांगितले होते तसेच गेल्या दोन दिवसांपुर्वी पती सुनिल याने विषारी औषध प्राषन केले होते त्यावर उपचार देखील करण्यात आले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .

तसेच वरिल विवाहतेला आपल्याच सारसच्या लोकांनी जिवे मारून तिचा मृत्यूदेह शेतात लटकवला व आत्महत्येचा बनाव केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला दरम्यान मयताचे शव विछेदनासाठी उमापुच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आनला असता नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल करा नसता प्रेत ताब्यात घेण्यात येणार नाही असा प्रवित्रा घेत उमापुरच्या राज्यमहामार्गावर तब्बल दोन तास ठिय्या मांडला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उप अधीक्षक स्वप्निल राठोड हे घटनास्तळावर दाखल झाले कायदेशीर कार्यवाई केली जाईल असे अश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले तसेच या प्रकरणी उमापुर चौकीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *