गेवराई दि २५ ( वार्ताहार ) नुकतीच देशाच्या सर्वोच्च पदाची राष्ट्रपती पदाची निवडणुक झाली या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले, याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यासह देशभरातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या निवडणूका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभरात तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांना निवेदनद्वारे मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीच्यावताने या आधी देखील घंटानाद, रस्तारोको अशी विविध अंदोलने करत निवडणुकीचे मतदान हे बॅलेटपेपरवर घेण्यात याव्यात यासाठी अंदोलने केली. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची सर्वप्रथम मागणी वंचीत बहुजन आघाडीने केल्यानंतर देशातील अनेक पक्ष, संघटणा यांनीही मागणी केली, विविध राज्याच्या विधानभवनात व देशाच्या संसदभवनात ईव्हीएम मशीनचा जोरदार विरोध करण्यात आला त्याचसह ईव्हीएम मशीन हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने ते हॅक होऊ शकते याची प्रात्याशिके दाखवली. तसेच इलेक्ट्रॉनिक मोबाईल, कॉम्पुटर, विविध वेबसाईट हॅक होतात तशीच ईव्हीएम मशीन देखील हॅक होऊ शकते. जपान, आमेरीका, चिन या प्रगत देशात ईव्हीएम मशीन तयार केली जाते परंतु तेथील मतदान हे बॅलेटपेपरवरच घेतले जात असतांना केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग यांच्यावर दबाव आणून विवडनुकीची मतदान प्रक्रिया हि बॅलेट पेपरवर न घेता ईव्हीएम मशीनवर घेण्यास का भाग पाडत आहे.ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात आलेल्या मतदानात प्रत्यक्ष केलेल्या मतदान संख्येत मोठी आफरातफरी झालेली आढळून आली आहे.
ईव्हीएम मशीनचा विरोध करत आगामी निवडणुका ह्या बॅलेटपेपरवरच घेण्यात याव्यात या मागणीसाठी दि. २५ सोमवार रोजी गेवराई तसहसिलवर एॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अदेशावरुन महाराष्ट्र राज्य प्रदेश आध्यक्ष मा. रेखाताई ठाकुर यांच्या सूचनेनुसार वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका आध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक निदर्शने कारण्यात आले, यावेळी तहसिल परिसर घोषणांमुळे दणाणून गेले होते. यावेळी भिमराव चव्हाण, किशोर भोले, दस्तगीर शेख, कृष्णा सामसे, किशोर चव्हाण, सुनिल धोत्रे, विलास वावधणे, सुंदर खापरे, अजय खरात, राजु गायकवाड, एकनाथ आडे, मुबारक पठाण, ऋषीराज कांडेकर, रामदास मोरे, अनिल तुरुकमारे, योगेश दळवी, संदिप प्रधान, महेश माटे, सचिन ईगवे, विठ्ठल हाराळे, राहूल कोकाटे, मुन्ना पहाडमुखे, बाळासाहेब मुळुकसह शेकडो वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.