गेवराईत पॉलिसीचे पैसे न देता बँक खातेदारांसह कर्जदारांची फसवणुक
पुर्णवादी बँकेच्या मॅनेजरसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
गेवराई दि ३ ( वार्ताहार ) :- बँक खातेदारांसह कर्जदारांकडून पॉलिसीच्या हप्त्यापोटी पैसे भरून घेवुन ते परत न देता फसवणुक केल्याचा प्रकार गेवराईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी गेवराईच्या पुर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या मॅनेजरसह तिघांविरूद्ध गेवराई पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पांडुरंग नाना कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आयसीआयसी लोंबार्ड जनरल इंशुरन्स कंपनीने व पुर्णवादी नागरी सहकारी बँक शाखा मॅनेजर यांनी माझ्यासह इतर खातेदार व कर्जदारांच्या पॉलिसीच्या हप्त्यापोटी पैसे भरून घेतले. मात्र पॉलीसीचे पैसे परत न देता दि. २४ जुन २०२० ते दि. १५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत फसवणुक केली. गेवराई येथील व्यवसायीक
याप्रकरणी कोल्हे यांच्या फिर्यादीवरून मार्तंड रेणापुरकर पुर्णवादी बँक शाखा गेवराई यांच्यासह भुसे, कवठेकर, आयसीआयसी लोंबार्ड जनरल इंशुरन्स कंपनी यांच्याविरूद्ध कंपनीतील मॅनेजर पुर्णवादी बँक शाखा गेवराई यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४०६, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो. नि. साबळे करीत आहेत.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...