लोणाळा,नंदपुर,कांबी राष्ट्रवादीच्या ग्रा पं सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
रोहित पंडित यांनी केले भगव्या रुमालाने स्वागत
गेवराई दि २८ ( वार्ताहार ) शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची मजबूत बांधणी होत असून, दिनांक 27 जून रोजी नंदपुर, लोणाळा, कांबी येथील ग्रामपंचायत सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. युवानेते रोहित पंडित यांनी सर्वांचे गळ्यात भगवा रुमाल घालून स्वागत केले.
गेवराई तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिवसंपर्क अभियान राबवून, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांची मजबूत मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या संपर्कात आलेले भाजपा व राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सातत्याने प्रवेश करत आहेत. दिनांक 27 जून 2022 रोजी तालुक्यातील कांबी, लोणाळा, नंदपुर या ग्रामपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पंडित सोमा पवार आणि जगन भिकू पवार, मच्छिंद्र पवार, भिकू पवार, सोमा देविदास पवार, नामदेव रूपसेन पवार यांच्यासह लोणाळा तांडा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. युवानेते रोहित पंडित, शिवसेना शहर प्रमुख सिनुभाऊ बेदरे यांनी सर्वांचे गळ्यात भगवे रुमाल घालून स्वागत केले. कोणतीही अडचण आल्यास आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू अशी ग्वाही यावेळी रोहित पंडित यांनी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांना दिली. यावेळी काशिनाथ आडगळे, नामदेव पवार, सिद्धेश्वर शेळके, अर्जुन गरड, श्रीराम पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...