भिमराव चव्हाण यांची राज्य समितीवर निवड ;वंचित आघाडीच्या वतिनं स्वागत 

                गेवराई दि २६ ( वार्ताहार )
राज्यात विरोधीपक्षाची भुमीका निभावनाऱ्या, ओबीसी समाजाच्या आरक्षण, सोशीत वंचीतासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या भटके विमुक्त राज्य सदस्य पदी भिमराव चव्हाण महाराज यांची वंचित बहुजन आघाडी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. एॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अदेशावरुन प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र मा. रेखाताई ठाकुर यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की ,छोट्याश्या तांड्यावरील व्यक्तीला राज्यपातळीवर भटके विमुक्त सदस्य पदी निवड केल्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.आनंद वाढवण्यासाठी व आपल्या गावातील भिमराव चव्हाण महाराज यांची वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्त राज्य सदस्य पदी निवड झाल्याबद्दल काठोडा तांडा येथे दि. २६ रविवार रोजी भव्य नागरी सत्काराचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजन केले होते. यावेळी बोलतांना भिमराव चव्हाण महाराज म्हणाले की सर्व भटके विमुक्त समाजासाठी आहोरात्र कष्ट घेवुन त्यासह ओबीसी आरक्षणासाठी पक्षाच्या अदेशानुसार अंदोलन उभा करु वाडी, वस्ती तांड्यावरील विखुरलेल्या समाजाला सोबत घेवुन वंचित बहुजन आघाडी पक्षाची ताकद वाढवेल असे प्रतिपादन केले.

यावेळी पप्पु गायकवाड, सुदेश पोद्दार, किशोर चव्हाण, किशोर भोले, देवराज कोळे, विलास वावधणे, बाबासाहेब शरणांगत, संजय शरणांगत, ज्ञानेश्वर हवाले, रामदन राठोड, अंकुश राठोड, नाथु राठोड, अजिनाथ राठोड, पांडु पवार,भगवान राठोड, साहेबराव जाधव, गंगुबाई चव्हाण, केसरबाई राठोड, शांताबाई राठोड, गिरजाबाई राठोड, बायनाबाई राठोड, झुगाबाई पवारसह शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. भिमराव चव्हाण यांच्या नागरी सत्कारावेळी काठोडा तांडा येथे सर्वप्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *