द केब्रिज इंटरनॅशनल स्कूल व ज्यु कॉलेजचा छ.संभाजीराजेंच्या हस्ते शुभारंभ


गेवराई – दि २६ (वार्ताहार ) – लाखो रुपये खर्च करून पुणे – मुंबईच्या तोडीस तोड अशी भव्य शाळा बांधकाम केलेल्या तालुक्यातील पहिल्या सीबीएसई संलग्न द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल व ज्यु कॉलेजचा शुभारंभ दि २७ जून रोजी छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या हस्ते होत आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की , २७ जून २०२२ रोजी सकाळी ११ वा गेवराई – जालना मार्गावर असलेल्या भव्य वास्तूचा शुभारंभ युवराज संभाजीराजे महाराज यांच्या हस्ते आणि खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. द केब्रिज स्कूल गेवराई तालुक्यातील पहिली सीबीएसई संलग्न शाळा आहे. ९ एकरच्या निसर्ग रम्य वातावरणात शाळा उभारण्यात आली आहे. कोटा ( राजस्थान ) येथील अनुभवी प्राध्यापक , विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष , आय आय टी, नीट, सीईटीची संपूर्ण तयारी केली जाते. विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र अभ्यासिका, अद्यावत वसतिगृह अशा सुविधा युक्त द केब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या शुभारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित ,आ लक्ष्मण पवार, माजी आ प्राध्यापक सुनील गाणे, छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन मोहन जगताप ,माजी आ शिवाजीराव चोथे, माजी आ राजेंद्र जगताप, यांच्यासह बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित ,माजी सभापती यूद्धजीत पंडीत, उपविभागिय अधिकारी नामदेव टिळेकर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कदम, भाऊसाहेब नाटकर ,सुशील जवंजाळ ,तहसीलदार सचिन खाडे, वकील संघाचे अध्यक्ष अमित मुळे, छत्रपती मल्टीस्टेट चे चेअरमन संतोष भंडारी ,बप्पासाहेब तळेकर, भरत दादा खरात , मस्के राजेंद्र, बेंद्रे किशोर कांडेकर ,विठ्ठल राठोड, डॉक्टर विजय घाडगे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पक्ष संघटनेचे पदाधिकारी पत्रकार उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आधार फाउंडेशन चे संचालक डॉक्टर वर्षा मोटे डॉक्टर बी आर मोटे, वैभव गवारे डॉक्टर जमादार ,विशाल चौरे, डॉक्टर मुरलीधर जाधव, प्रवीण खरात, तसेच द केब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डॉक्टर सारिका नारायण आदींनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *