बनावट उत्पन्नाचा दाखला देऊन अनेक सेतू चालक करत आहेत अनेक लाभार्थी यांची फसवणुक

गेवराई दि २३ ( वार्ताहार ) संजय गांधी निराधार व अन्य योजनेचा लाभ अनेक जेष्ठ नागरिक घेतात परंतू वर्षांतून एकदा त्यांना तहसिल कार्यलयात हयातीचा दाखला द्यावा लागतो परंतू २१ , ००० हजाराचे उत्पन्न मिळत नाही म्हणून चक्क सेतू चालक अनेक लाभार्थी यांची फसवणूक करत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे .

या बाबद सविस्तर माहिती अशी की , दारिद्र रेषेखालील हे सगळे लाभार्थी आहेत तसेच अश्या नागरिकांना २१ ००० हजाराचे उत्पन्न मिळते परंतू ज्याच्याकडे दारिद्र रेषेचे प्रमाणपत्र नाही किंवा हरवले आहे अश्या जेष्ठ नागरिकांची सेतू चालक फसवणूक करत आहेत तसेच एका उत्पन्नाच्या दाखल्याचे ३०० रुपये घेतले जातात त्यांना बनावट उत्पन्नाच्या दाखल्याची प्रिंटआऊट काढून दिली जाते तसेच हे सगळे कागदपत्रे तलाठी यांच्याकडे दाखल केल्यानंतर यांची तपासणी केली जाते परंतू हे प्रमाणपत्र शासनाच्या वेबसाईडवर दिसत नाही यामुळे अनेक नागरिकांची नावे वगळली जातात परंतू सगळेे कागदपत्रे खरे देऊनसुद्धा बनावट प्रमाणपत्राला बळी पडलेले जेष्ठ नागरिक तहसिल कार्यलयाकडे खेट्या मारतात तसेच या प्रकरणी गेवराईचे तहसिलदार यांनी अश्या सेतू चालकांविरूद्ध कार्यवाई करावी तसेच २१ हजार रुपये उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करावी अशी मागणी लाभार्थी यांच्याकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *