गेवराई दि २० ( वार्ताहार ) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी घोषित केलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये गेवराई तालुक्यातील शोभा देवी महिला सेवाभावी संस्था संचलित अहिल्याबाई होळकर विद्यालय खांडवी या विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.शाळेतून गुणानुक्रमे भोजने आकाश रामदास (94), शेजुळ कोमल तुळशीराम (93.60), रविराज दत्तात्रय शिंदे(88.40), प्रियंका अंकुश राठोड(88.40) टक्के घेऊन गुणानुक्रमे प्रथम,द्वितीय,आणि तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.